|
|
|
गुहेत असलेल शिवलिंग!!! |
गुहेचे प्रवेशद्वार!!! |
गुहेतील इतर शिल्प!!! |
श्री देव कुणकेश्वर मंदीराच्या पुर्व दिशेच्या डोंगर उतारावर 1920 साली
खोदकाम सुरु असताना एक गुहा सापडली. या गुहेचे द्वार अडीज फुट रुंद व 4 फुट
उंचीचे आहे. जांभ्या खडकात कोरुन काढलेली ही गुहा अंदाजे 10 बाय 12 फुटाची
आहे. गुहेची उंची 6 फ
ुट ईतकीच आहे. या
गुहेत काळ्या पाषाणात कोरलेली रेखीव लेणी आहेत. यामध्ये शिवलींग, नंदी,
स्त्री-पुरुषांचे मुखवटे आहेत. या शिल्पांच्या रचनेवरुन अभ्यासकांनी विविध
निष्कर्ष मांडले आहेत. काहींच्या मते हे मुखवटे राजघराण्यातील स्त्री
पुरुषांचे असावेत तर काहींच्या मते ते आदीवासी लोकांचे असावेत. तर ईस्लामी
आक्रमणा पासून बचावासाठी ही शिल्पे गुहेत लपविण्यात आली अशी शक्यता ही
वर्तविण्यात आली आहेत. या गुहेत उजव्या कोपय्रात अर्धवट बुजलेल्या
स्थितीत एक भुयार आहे. या भुयारामध्ये प्रवेश करता येत नाही. याबाबत
कोणाकडे पक्की माहीतीही उपलब्ध नाही. कुणकेश्वर येथील ही गुहा
मंदीरापासुन काही मिनीटांच्या अंतरावर, चांदेलवाडीतील पावणाई मंदीरानजीक
असलेल्या आमराईत आहे. हे स्थान दुर्लक्षित आहे. त्यामुळे फारच कमी लोकांना
याची माहीती आहे. ही गुहा कुणकेश्वर गावच्या प्राचीन संस्कृतीचा एक
अनमोल ठेवा असुन या गुहेमुळे कुणकेश्वरच्या सौँदर्यात अधीकच भर पडते.
No comments:
Post a Comment